{"product_id":"yugapravartak-chatrapati-shivaji-maharaj","title":"YUGAPRAVARTAK CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ  (युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज )","description":"\u003ch3\u003e\u003cstrong\u003eयुगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज \u003c\/strong\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003eशिवाजीराजांपेक्षा जास्त देश जिंकून त्यांच्यावर राज्य करणारे पुरुष जगाच्या इतिहासात पुष्कळ आढळतील; पण त्यांच्याइतका गुणसमुच्चय एका व्यक्तीत एकत्रित झालेला सहसा आढळत नाही. कोणास कधी जहागिरी अगर जमिनी तोडून न देणारे; न्यायाच्या कामात कोणाची भीडमुर्वत न धरणारे; दुष्टांचा काळ पण गरिबांचे कनवाळू, नेहमी मातेच्या वचनात राहून अहर्निश राष्ट्राची चिंता वाहणारे; स्वदेश, स्वभाषा व स्वधर्म या विविध संपत्तींचे संगोपन करणारे; पापभीरू परंतु रणशूर असे हे आधुनिक काळाचे अद्वितीय स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने 'युगप्रवर्तक' होते. छत्रपती शिवरायांच्या तलवारीने मुघली आक्रमणे परतवून लावली. महाराजांच्या लोककल्याणकारी धोरणाने रयत सुखी-समृद्ध झाली, हिंदू धर्माची आणि संस्कृतीची भगवी पताका डौलाने फडकू लागली. वा. कृ. भावे यांनी युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचे हेच कार्यकर्तृत्व आणि जीवनचरित्र प्रस्तुत ग्रंथात मांडले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : वासुदेव कृष्ण भावे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : कृष्णा पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51941078040898,"sku":null,"price":359.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/yugparvartakchatrapatishivajimaharaj-f.jpg?v=1770371813","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/yugapravartak-chatrapati-shivaji-maharaj","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}