Author : Dr Mahendra Khadgavat | Publisher : Marathidesha Foundation |
Translator : - | Category : शिवाजी महाराज साहित्य |
ISBN No. : 9788195478989 |

औरंगजेबाकडून विजापूरवर आक्रमणाची तयारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पुरंदरचा तह.
१२ जून १६६५ रोजी शिवाजी महाराज व मुघल सेनापती मिर्झाराजा जयसिंग यांच्यामध्ये झालेला तह हा इतिहासात “पुरंदरचा तह” ह्या नावाने प्रसिध्द आहे. मराठ्यांच्या इतिहासातीलच नव्हे तर भारताच्या इतिहासातील ही एक कलाटणी देणारी शस्त्रसंधी आहे. या तहानंतर मिर्झाराजांनी सर्व अटी/शर्ती काय ठरल्या हे बादशहाला कळवून त्या बादशहाने मान्य करण्याचे व तसे फर्मान जारी करण्याची बादशहाला विनंती केली. त्यानुसार बादशहाने त्या तहाला व त्यातील ठरवलेल्या कलमांना मान्यता देणारे फर्मान स्वहस्ते शिक्कामोर्तब करून पाठवले. हा मूळ तह बावीस फुटी लांब असून ९९ ओळींचा आहे. या तहाचा मायना आधीच्या इतिहास अभ्यासकांना उपलब्ध होता पण मूळ तहाची डिजिटल प्रत तसेच मूळ फारसी तहाचा सुलभ मराठी अनुवाद या छोटेखानी पण मौलिक ग्रंथामार्फत इतिहासप्रेमींना उपलब्ध होतोय ही फार मोठी उपलब्धी आहे.