मातृभूमीपासून दूर जाताना या स्वातंत्र्यवीराने तिला अभिवचन दिले: ‘ सारथी जिचा अभिमानी, कृष्णजी अणी राम सेनानी । अशी तीस कोटि तव सेना । ती अम्हाविना थांबेना । परि करुनि दुष्टदलदलना । रोविलच स्वकरी स्वातंत्र्याचा हिमालयावरि झेंडा जरतारी ॥’ त्या अदम्य आत्मविश्र्वासाची ही तेजोगर्भ चरितकहाणी.