‘प्लेझर बॉक्स’ च्या निर्मितीत एक गोष्ट कटाक्षाने टाळायचा प्रयत्न केला आहे. निव्वळ खुषामत करणारी पत्रं किंवा संपूर्ण पत्रातला खुषामत वा बेदम कौतुक करणारा मजकूर प्रकाशित होऊ द्यायचा नाही. ही खुषीपत्रांची पोतडी नाही. हा एक संवाद आहे. आनंदाची देवाणघेवाण आहे.