प्रबोधनकार ठाकरे हे सत्यशोधक चळवळीचे एक प्रमुख आणि प्रखर प्रवक्ते होते. कडक आणि प्रसंगोपात भडकही होणाऱ्या त्यांच्या लेखनशैलीमुळे ‘प्रबोधन’ त्या काळात खूपच गाजले. वृत्तपत्रातील कर्तबगारी ज्यांच्या नावाशी कायमची निगडित झाली आहे असे जे थोडे पत्रकार महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, त्यात प्रबोधनकार हे एक प्रमुख नाव आहे.