ऐसी कळवळयाची जाती हा प्रा. मिलिदं जोशी यांनी रेखाटलेल्या सतरा व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. शब्दांतून प्रकटलेल्या या व्यक्तींचे सुरम्य दर्शन घेताना वाचकही माझेप्रमाणे या व्यक्तींशी आत्मीय संबंध जोडतील, एवढी ही व्यक्तीचित्रे वेधक झालेली आहेत. आपल्या आतल्या दृष्टीपुढे या व्यक्ती साक्षात उभ्या राहतात. झाडांना नवी पालवी फुटते, तसे शब्दांना डोळे फुटतात.