लग्नाला पाच - सहा वर्ष झाल्यानंतर संसारात जेव्हा तोचतोचपणा वाटू लागतो, जोडीदार नीरस आणि कंटाळवाणा होउन जातो तेव्हा आपल्या या सर्वात जवळच्या नात्याला खतपाण्याची गरज लागते. हे खतपाणी म्हणजे नेमकं काय, कशाप्रकारे हे नातं पुन्हा एकदा बहरू शकतं, दृढ आणि सुंदर होउ शकतं याचं प्रभावी मार्गदर्शन या पुस्तकात आहे.