चांगदेव पाटलानं स्थळकाळापासून केलेला सगळा प्रवास एका सांस्कृतिक अवकाशातून घडणारी जाणिवेची यात्रा आहे आणि पात्रांचे, स्थळांचे, घटनांचे सगळे अपरिहार्य तपशील जरी एहिक आणि जडाच्या पातळीवरले असले तरी त्यांचा आशय आध्यात्मिक आहे.