1928 च्या उन्हाळयात माझी मुलगी इंदिरा हिमालयात, मसूरीला होती आणि मी पायथ्याशी सपाटीवरील प्रदेशात होतो. त्यावेळी ही पत्रे मी तिला लिहिली. दहा वर्षांच्या मुलीला लिहिलेली ही वैयक्तिक पत्रे आहेत. पण माझे मित्रांना त्यात काही विशेष आढळले आणि ही पत्रे वाचकांसमोर ठेवावीत हा त्यांचा सल्ला मी मानला.