शिवाजी महाराजांनी केवळ मराठ्यांसाठी स्वराज्य स्थापन केलं असं नाही तर ते मध्ययुगीन भारत घडवणारे बुध्दिमान होते. राज्यकर्ते पडले, साम्राज्यं लयाला गेली, राजवंश नामशेष झाले पण शिवाजी महाराजांसारख्या सच्चा नायकाची स्मृती ही संपूर्ण मानववंशासाठी एक शाश्वत ऎतिहासिक देणगी ठरली आहे.