असे काही.... लहानपणापासून पुस्तकांत कुठे काही लक्षणीय, चित्तवेधक, सुंदर आढळले, तर ते मी जवळ लिहून ठेवत असे. बालवय गेले, पण तो छंद सुटला नाही. उलट मोठेपणी मराठीच्या जोडीने इंग्रजी, संस्कृत या भाषांशीही निकट परिचय झाला, तेव्हा तर अशा उक्तींचे समृद्ध भांडारच हाती गवसल्यासारखे वाटले. इंग्रजी, संस्कृत कवितांचे अनुवाद करून त्यांचाही मी माझ्या संग्रहात समावेश केला