मानवी स्वभावाचे त्रिगुणात्मक विश्लेषण (प्राचीन मानसशास्त्र) अर्थात् गीतेचा दैनंदिन जीवनाशी संबंध या व्यवहारोपयोगी ग्रंथाचे लेखक डॉ. श्रीपाद जोशी अर्थशास्त्राचे अध्यापन करत असताना आपल्या चिंतनधारेने प्रेरित होऊन अर्थशास्त्रावर भारतीय चिंतनाचा प्रभाव, उदारीकरणाच्या संदर्भात गांधींचे चिंतन इत्यादी ग्रंथांच्या लेखनानंतर, बालपणापासून आध्यात्मिक वातावरणाशी निगडित राहिल्यामुळे डॉ. जोशी यांनी गीतानुसंधानाला प्रारंभ केला, त्याचे फळ म्हणजे हा ग्रंथ आहे.