"ती अगदी साधीशीच काचबंद डबी त्याने नीट निरखून पाहिली. अल्बर्टने ती डबी कशीही धरली, तरी त्यातली डुगडुगती सुई मात्र पुन्हा पुन्हा उत्तर दिशेकडेच वळायची! वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी हाती आलेल्या या कंपासने फिजिक्सच्या अदृश्य आणि अद्भुत नियमांचं कौतुक अल्बर्ट आइनस्टाइनच्या मनात असं पेरलं गेलं" प्रकाशाच्या झोतावर स्वार होऊन प्रवास करता आला तर? दोर कापलेल्या लिफ्टमधून पडताना माणसाला गुरुत्वाकर्षण जाणवेल का? अशा काहीतरी भन्नाट कल्पना त्याला सुचायच्या. Marathi Book Albert Einstein by Chaitali Bhogale Diamond Publication, Kanak Books | Author Chaitali Bhogle Books in Marathi