अगाध सरोवरापासून हजारो लहानलहान ओढे निघतात त्याप्रमाणे सत्वनिधि भगवान श्रीहरीचे असंख्य अवतार होत असतात. ऋषी, मनू, देवता, प्रजापती हे सर्व अवतार तर भगवंताचे अंशावतार अथवा कलावतार होत. परन्तु भगवान श्रीकृष्ण तर स्वयं भगवानच होत, अर्थात ते पूर्णावतार होत.