मनोहर पर्रीकर यांच्यासारखी संवेदनशील समाजहितैषी विचारी राजकारणी माणस आता दिसेनाशी होत आहेत या पार्श्वभूमीवर पर्रीकर एखाद्या देदीप्यमान तार्यासारखे काही काळ भारताच्या राजकीय क्षितिजावर चमकले आणि अकस्मात अस्तंगत झाले त्यांचे जाणे सर्वांना चटका लावून गेले