गोरगरिबांच्या प्रश्नांची तळमळ, अन्यायाविरुधी लढण्याची उत्कटता, प्रसंगी आक्रमता, अंगीकृत कार्याची कळकळ व प्रचंड व्यासंग या एन.डींच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये एन. डींच्या लेखनातही दिसतात. म्हणूनच लिहिणारे एन.डी. व लढणारे एन.डी. यात फरकच करता येत नाही.