Rana Jaysing Ani Shivaji Maharaj Yanchi Rajkarani Chadhaodha ( राणा जयसिंग आणि शिवाजी महाराज यांची राजकारणी चढाओढ )
Author : V S Bendre | Publisher : Marathidesha Foundation |
Translator : - | Category : शिवाजी महाराज साहित्य |
ISBN No. : 9788194998471 |

राजकारणातील शिवछत्रपतींचा मनोनिग्रह, धाडसी प्रवृत्ती, कुशल योजकता, स्वार्थत्याग, आत्मविश्वास, शत्रूलाही आपलेसे करून घेण्याचे वाक्चातुर्य, औरंगजेबासारख्या अनुभवपूर्ण शत्रूला त्याच्या खुनी प्रवृत्तीला संयमाला प्रवृत्त करणारे मनोधैर्य, युध्दचातुर्य वगैरे कितीतरी गुण या राजकारणातील हालचालीत उत्कटतेने दृष्टिगोचर होतात. आधी प्रजेचे किंवा समाजाचे, नंतर आपल्या कुटुंबाचे आणि शेवटी आपले स्वास्थ्य पहाणे हा उत्कृष्ट आचारधर्म कितीसा आणि कुठे पाळला जातो? शिवछत्रपतींनी आपल्या मुलाला हाच आचार्धर्म अनुभविला आणि तो त्याच्या स्वभावात पुढे उतरला असला तर नवल कसले? सारांश पावणेदोन - दोन वर्षांतील खासा शिवछत्रपतींनीच खेळलेल्या या राजकारणातील आदर्श इतिहासात क्वचितच सापडेल.