Rajkiy Natak Ani G P Deshpande ( राजकीय नाटक आणि गो पु देशपांडे )
Author : Ramesh Salunkhe | Publisher : Lalit Publication |
Translator : - | Category : संदर्भग्रंथ |
ISBN No. : 9788194927709 |

Author : Ramesh Salunkhe | Publisher : Lalit Publication |
Translator : - | Category : संदर्भग्रंथ |
ISBN No. : 9788194927709 |
गो पु देशपांडे हे भारतीय पातळीवरील महत्त्वाचे नाटककार आहेत. राजकीय विचारांचे चर्चानाट्य लिहिणार नाटककार म्हणून गो पु देशपांदे यांच्या नाट्यलेखनास असाधारण असे महत्त्व आहे. त्यांच्या विचारांवर आणि नाट्यदृष्टीवर समाजवादी मार्क्सवादी दृष्टीचा खोलवर प्रभाव आहे. महाराष्ट्राच्या अधोगतीशी आणि शतखंडिततेशी गो पुं च्या नाटकांतील आशयस्वरूपाचा जवळचा संबंध आहे. प्रबोधनकाळाची उतरती कळा, विविध विचारव्दंव्दे, समाज अंतर्विरोध, समाजपरात्मता ते भाषार्हासाची आशयसूत्रे त्यांच्या नाटकांतून अभिव्यक्त झाली आहेत. एकमय समाज घडवू पाहणार्या काळानंतरच्या र्हासपर्वाचे चित्र त्यांच्या नाटकांत आहे. भारतीय समाज, इतिहास, तत्त्वपरंपरेचे खोलवरचे भान आणि भाषारूपाची सूक्ष्म जाण त्यांच्या नाट्यलेखानातून अभिव्यक्त झाली आहे. त्यामुळे विचारनाट्य आणि राजकीय चर्चानाट्य घडविण्याचे श्रेय गो. पु. देशपांडे यांच्याकडे जाते.
Publisher | Lalit Publication |
---|---|
Auther | Ramesh Salunkhe |
Edition | 2021 |
Weight | 0.450000 |
Pages | 294 |
Language | Marathi |
Binding | paperbag |
ISBN No. | 9788194927709 |