Author : Dipali Sawai | Publisher : Continental Prakashan |
Translator : - | Category : - |
ISBN No. : - |

मोना ही एक अत्यंत हुशार शास्त्रज्ञ असते. नवनवीन कल्पना तिच्या डोक्यात कायमच येत. पारयिष्णू रिसर्च सेंटरमध्ये काम मिळाल्यापासून मोना एकदम खुशीत असते. तिथे काम करणे, म्हणजे तिच्यासाठी रोजची मेजवानीच होती. पण तिच्या जीवश्चकंठश्च मैत्रिणीची, अरुंधतीची तब्बेत जशी ढासळायला लागते, तसे मात्र तिला काही सुचेनासे होते. तिची बुध्दी, तिचे ज्ञान जर तिच्या मैत्रिणीसाठी उपयोगी पडत नसेल, तर त्याचा काय उपयोग; म्हणून तिची कल्पना आणि बुध्दी ती पणाला लावते. तिचे स्वप्न तिला आता सत्यात उतरवायचे असते. तिच्या या संशोधनासाठी ती अमूल्यची साथ सोडायलाही तयार होते. त्यावर्षीच्या देशाच्या युवा शास्त्रज्ञा च्या पारितोषिकासाठी मोनाचे नाव रेकमेंड केले जाते. पण त्याहीपेक्षा तिला आनंद होतो, तो तिच्या मैत्रिणीला ती एका काळोख्या गर्तेतून बाहेर काढू शकते याचा ! काय होते , हे तिचे रिसर्च प्रोजेक्ट?