Vivekanand Kanya Bhagini Nivedita ( विवेकानंद कन्या भगिनी निवेदिता )

SKU
DNY0036
In stock
₹80.00
Author : V V Pendse Publisher : Dnyan Prabodhini
Translator : - Category : -
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview

रवींद्रनाथ, योगी अरविंद, जगदीशचंद्र, गोपाळ कृष्ण गोखले अशा अनेक थोर लोकांशी त्यांचा गाढ स्नेह होता. हिंदू संस्कृतीच्या विविध पैलूंचा अभिमान बाळगून त्याविषयीच्या विविध पुस्तकांचे लेखन केले. काही वेळा त्यांनी एकांतात जाऊन साधना केली. निवेदितांचे आयुष्य उण्यापुर्‍या ४६ वर्षांचे होते. त्यांपैकी हिंदुस्थानातील १३ वर्षांंच्या त्यागी व नि:स्वार्थ सेवाजीवनाचा आढावा घेणारे हे पुस्तक.

भगिनी निवेदिता ( मार्गारेट नोबल ) या वंशाने गोर्‍या आणि जन्माने आयरिश. स्वामी विवेकानंदांच्या सहवासात आल्यानंतर त्यांचे शिष्यत्व पत्करून ऎन तिशीत त्यांनी हिंदुस्थानात येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. स्वामीजींनी त्यांना निवेदिता- जीवन निवेदित समर्पित केलेली असे नाव दिले. निवेदितांनी स्वत"च्या सवयी, स्वभाव, अहंकार या सर्वांना मुरड घालून हिंदू संस्कृती अभ्यासपूर्वक आत्मसात केली. संन्यासव्रताची दीक्षा घेतली. प्लेगच्या साथीच्या काळात त्यांनी कोलकत्यातील रस्ते झाडण्यापासून सुरुवात करून प्रत्यक्ष रूग्णसेवाही केली. एक विद्यालय चालवून महिलांसाठी शिक्षणाचे काम केले. ब्रिटिशांच्या पारतंत्रातील या देशात निवेदिता बंगालमधील क्रांतिकारकांची प्रेरणा आणि आधारस्तंभ बनल्या.

More Information
Publisher Dnyan Prabodhini
Auther V V Pendse
Edition 2009
Weight 0.450000
Pages 252
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:Vivekanand Kanya Bhagini Nivedita ( विवेकानंद कन्या भगिनी निवेदिता )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat