Akshardhara Book Gallery
Navrasancha Jadugar Mohammad Rafi ( नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी )
Navrasancha Jadugar Mohammad Rafi ( नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही !
पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब.. प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं उमटल्या... रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार !
संगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य ! अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी आणि त्यांचं रेशमी रसग्रहण... क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधाही आहे...
या पुस्तकाचे लेखक : मृदुला दाढे , प्रकाशक : राजहंस प्रकाशन
