Akshardhara Book Gallery
नारायणराव पेशव्यांची हत्या | Narayanrao Peshwyanchi Hatya
नारायणराव पेशव्यांची हत्या | Narayanrao Peshwyanchi Hatya
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
नारायणराव पेशव्यांची हत्या
पुण्याच्या शनिवार वाड्यात दिवसाढवळ्या घडलेली शोकांतिका
ऑगस्ट १७७३,
शनिवार वाडा त्या दुर्दैवी दिवशी पुण्यातील मराठ्यांचे सत्ताकेंद्र असलेला शनिवार वाडा, त्यांच्या स्वतःच्या पेशव्याच्या हत्येमुळे रक्तरंजित झाला. खरं तर त्यावेळी माधवराव पेशव्यांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून मराठे कसेबसे सावरण्याचा प्रयत्न करत होते, तोच नारायणराव पेशव्यांच्या झालेल्या या निघृण हत्येने संपूर्ण मराठा साम्राज्य प्रचंड हादरून गेले. या राजकीय कटामुळे आणि हत्येमुळे साम्राज्यात दुफळी निर्माण झाली आणि ते यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले.
अशा बिकट परिस्थितीतसुद्धा धमक्यांना आणि राजकीय दबावाला बिलकूल भीक न घालता रामशास्त्री प्रभुणे या मराठ्यांच्या मुख्य न्यायमूर्तीनी पेशव्याच्या हत्येचा तपास सुरू केला. नारायणराव पेशव्यांची हत्या कोणी केली होती? या हत्याकांडाचा सूत्रधार कोण होता? रामशास्त्रींना न्यायदानाच्या कामात यश आलं का? नारायणराव पेशव्यांनंतर पेशवाईच्या बाबतीत नेमकं काय घडलं?
सत्य घटनांमधून स्फूर्ती घेऊन शनिवारवाड्यात एकाच दिवशी पेशव्यांसह इतरांच्याही झालेल्या सनसनाटी हत्यांची मांडलेली थरारक सत्य कहाणी आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीला अभूतपूर्व कलाटणी देणारा मुख्य न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणेंनी चालवलेला खटला !
या पुस्तकाचे लेखक : अंकुर चौधरी, प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन