Akshardhara Book Gallery
Mahabharat Te Bharat @ 2025 ( महाभारत ते भारत @२०२५ )
Mahabharat Te Bharat @ 2025 ( महाभारत ते भारत @२०२५ )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
महाभारत ते भारत @२०२५ माधव जोशी
'महाभारत ते भारत@ २०२५' या उल्लेखनीय पुस्तकाचा प्रवास 'इंडिया' या नावाने जगाला ओळख असलेल्या या प्राचीन, चिरंतर आणि विकसनशील राष्ट्राप्रती असलेल्या श्रद्धेने उलगडतो. लेखकाने पानोपानी असा सुंदर गोफ विणला आहे की या भूमीचा अलौकिक इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म जिवंत होऊन डोळ्यासमोर उभे राहते.
हे पुस्तक वाचताना तुम्हाला एका सशक्त राष्ट्राची स्पंदनेच नव्हे, तर पिढ्यानपिढ्यांचे शहाणपणही जाणवेल.
लेखक माधव जोशी आमचे आभार आणि कृतज्ञतेला पात्र आहेत. महाभारत ते भारत @ २०२५ या गौरवशाली प्रवासात आपल्याला बरोबर घेऊन जाण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल धन्यवाद. आपण भारतीय काय होतो आणि काय आहोत याबद्दल अभिमानाची भावना निर्माण केल्याबद्दल कृतज्ञता.
- पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर
मी या ग्रंथाच्या हस्तलिखिताचा अभ्यास करण्यास सुरुवात केली, तेव्हा माझ्या मनात विचारांचे न संपणारे आवर्त निर्माण झाले भारत म्हणजे काय?
..या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हे पुस्तक एक चांगला आरंभ बिंदू आहे....
मी लेखकाचे त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन करतो आणि हे पुस्तक सर्व वयोगटांतील वाचकांनी वाचावे अशी शिफारस करतो.
हे पुस्तक आपल्या महान देशाचे वैभव, यशापयश, आणि चढ-उतारांचा प्रवास नेमकेपणाने मांडते.
- श्री. हरीश साळवे, वरिष्ठ अधिवक्ता