Akshardhara Book Gallery
100 Jagprashiddh Udoyjak (१०० जगप्रसिद्ध उद्योजक)
100 Jagprashiddh Udoyjak (१०० जगप्रसिद्ध उद्योजक)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sudheer Rashingkar
Publisher: Utkarsh Prakashan
Pages: 336
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
100 Jagprashiddh Udoyjak (१०० जगप्रसिद्ध उद्योजक)
उद्योजक होण्यात आपल्याबरोबर समाजाच्या गरजेचे असे काही याचे संशोधन, उत्पादन, विक्री, सेवा किंवा सेवाभावी क्षेत्र स्थापन करणे आणि त्याचबरोबर रोजगार संधी निर्माण करणे याला उद्योजकता म्हणता येईल. यासाठी मला स्वतंत्र उद्योगच करायचा आहे अशी अंत:प्रेरणा आपल्यात असायला हवी. मग आपले शिक्षण, अनुभव, सांपत्तिक किंवा कौटुंबिक पार्श्वभूमि, स्पर्धा वगैरेवर स्त्री किंवा पुरुष असला तरी मात करता येते. अशी अंत:प्रेरणा घेऊन आपला उद्योग शून्यातून सुरू करून जगभर पसरवणाऱ्या उद्योजकांपैकी भारतासहपूर्वेकडील जपान ते पश्चिमेकडील अमेरिकेपर्यंत पसरलेल्या गेल्या दीड शतकातील विविध क्षेत्रातील निवडक स्त्री आणि पुरूष उद्योजकांच्या कार्याची माहिती या पुस्कातील १०० उद्योजकांच्या परिचयातून मिळेल. त्यांनी आपापली कार्यक्षेत्रे निवडली आणि त्यात स्वयंविकास साधला आणि उद्योग जागतिक पातळीवर नेला आणि मुख्य म्हणजे रोजगार निर्मिती केली. यात भारतीयही ४० च्यावर आहेत. या सर्वांच्या कार्याची व्याप्ती, प्रगती आणि उपलब्धी पाहून आपण थक्क व्हाल आणि त्याचबरोबर आपणही असेच काही कार्य करू शकू असा आत्मविश्वास आणि प्रेरणाही आपल्याला मिळेल. अशा या पुस्तकाची निर्मिती उत्कर्ष प्रकाशनाने केली असून त्याचे लेखक आहेत सिद्धहस्त लेखक डॉ. सुधीर राशिंगकर.
लेखक: सुधीर राशिंगकर
प्रकाशक: उत्कर्ष प्रकाशन
