akshardhara
G A chi Nivadak Patre Khand 1 (जी. एं. ची निवडक पत्रे खंड १)
G A chi Nivadak Patre Khand 1 (जी. एं. ची निवडक पत्रे खंड १)
Share
Couldn't load pickup availability
Author: G .A. Kulkarni
Publisher: Mouj Prakashan
Pages: 306
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator: ---
माझ्या कथात बहिणीचें प्रेम व गाय यांचे उल्लेख जरूरीपेक्षा जास्त येतात, असे मला एका टीकाकाराने इशारा दिला आहे. पहिल्या विषयाबाबत बिलकूल चर्चा नाही. तो अत्यंत वैयक्तिक असल्यानें Taboo आहे. पण दुसर्या बाबतच्या आठवणी त्या कवितेमुळे ढवळल्यागेल्या. लहानपणी आमच्या घरी गाय नव्हती असा एक दिवस मला आठवत नाही. गाईच्या पाठीवर हात ठेवताच होणारी तिच्या कातडीची ओळख दाखवणारी थरथर, तिचा वास, रात्री गवत टाकायला जातांना हातातील कंदिलाचा प्रकाश तिच्या डोळ्यावर पडताच चमकणारे गडद लालसर भिंग, या आठवणी आजदेखील इतक्या स्पष्ट आहेत की त्यांतील एक हाताने उचलून मी तुम्हांला देऊ शकेन. ती वीत असतां कुळोथ गहूं यांचा भरड सांजा शिजवून तासन् तास उत्सुक वाट आम्ही पाहिली; मग घरोघर भांड्यांतून खरवसाचे दूध वाटले, व तांब्या परत देताना त्यांतून थोडे तांदूळ सगळ्यांनी दिले. गरम खरवस खायचा, पण खरवसावर फुंकर घालायची नाही, नाहीतर वासरू कापर खाते, हे नियम अगदी कडकपणे, निदान इतरांचे लक्ष असतांना तरी, पाळले. घर बदलले कीं गाय संवशीने जुन्या घरासमोर जाऊन शांतपणे उभी राहत असे, तिला मुद्दाम नव्या घराची संवरा करावी लागे. या सार्या बरोबर, गाय आडवी झालेली पाहिली; तिचे डोळे सतत कां पाझरूं लागले या विचाराने रात्रीची जेवणें तशीच राहिली. पाण्याचे पातेले व गवताची पेंढी घेऊन समोर तासन् तास काढले, व शेवटी चारसहा जणांनी तिला उचलून गाडीत ठेवलेले देखील मी पाहिले. त्यानंतर घरात गाय आली नाही. वडील माणसे वरवर विषण्णतेने म्हणाले, आतां गाय नको. भाड्याने घर मिळायला अडचन तरी पडणार नाही, पण ती दोन दिवस जेवलीच नाहीत. घरातून गाय गेली, व आमचे बालपण घेऊन गेली. हे सारे या कवितेमुळे ढवळून निघाले. हा response सगळा अ-वाङ्मयीन आहे खरा. नव्या रांकेत त्याला स्थान वा महत्त्व नाही. पण मला मात्र वाङ्मयीन म्हणजे नेमके काय हे अद्याप समजले नाही. कविता वाचायला मी माझ्या आठवणी, आवडीनिवडी हे सारे घेऊनच येतो. धार्मिक प्रसंगी जानव्यांतील लोखेंडी किल्ली काढून ठेवावी त्याप्रमाणे इतर सारे बाजूला ठेवत नाही. कवितेतील पहिल्या ओळींतील तिसर्या शब्दाचा ताण सहाव्या ओळीतील पाचव्या शब्दाशी आहे, असली टीका मला निर्जीव व निष्फळ वाटते... - जी. ए. कुलकर्णी
ISBN No. | :9788174863706 |
Author | :M D HATKANAGALEKAR |
Publisher | :Mauj Prakashan Gruha |
Binding | :Hard Bound |
Pages | :306 |
Language | :Marathi |
Edition | :2011/03/01 - 3rd/1995 |