Alimbichi Lagvad ( आळिंबीची लागवड )
Alimbichi Lagvad ( आळिंबीची लागवड )
Low stock: 3 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
निसर्गात अनेक आकारांच्या व विविध रंगांच्या अळिंबी आढळून येतात. मुख्यता: कुजलेला काडी कचरा, वाळलेल्या झाडांचे अवशेष इत्यादी ठिकाणी अळिंबी वाढताना आढळतात. अळिंबीच्या हजारो जातींपैकी फारच थोड्या जाती खाण्यास योग्य आहेत. काही जाती विषारी असल्याने निसर्गातील नवीन अळिंबी खाण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घ्यावा. अळिंबी ही हरितद्रव्यविरहित वाढणारी एक प्रकारची वनस्पती असून, वाढीसाठी तयार अन्नपुरवठ्यावर ती अवलंबून असते. अळिंबीबद्दल बरेच गैरसमज असून या पुस्तकातील शास्त्रीय माहितीच्या आधारे ते दूर होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. अलीकडच्या काळात विशेषत: पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात अळिंबीचा खाण्यातील वापर वाढला असल्याने या शहरात व जवळपास अळिंबी लागवड केली जात आहे. कृषी महाविद्यालय, पुणे येथील अळिंबी संशोधन केंद्रामार्फत वेगवेगळ्या माध्यमातून अळिंबी लागवडीचा प्रसार केला जात आहे. यामुळे बरेच इच्छुक अळिंबी लागवडीच्या क्षेत्रात येत आहेत. अशा लोकांना तांत्रिक माहिती पुरविणे व लागवडीतील धोके त्यांच्या नजरेस आणण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
Author | :P A Shinde |
Publisher | :Continental Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :78 |
Language | :Marathi |
Edition | :2001 |