Ranragini Tararani (रणरागिणी ताराराणी)
Ranragini Tararani (रणरागिणी ताराराणी)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
छत्रपती शिवाजी महाराजांचे जणु प्रतिरूप असलेल्या ताराराणीने आपल्या तीव्र बुध्दिमत्तेच्या जोरावर धैर्याने छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले जणु नूतनसृष्टी असे हिंदवी साम्राज्य औरंगी अस्त्रातून वाचविले. आपल्या अजोड अशा नेतृत्वगुणाने, तेजस्वी बाण्याने महाराष्ट्रात एक अभूतपूर्व अशा स्वातंत्र्य-संग्रामास नेतृत्व दिले. ६१ वर्षांचे वैधव्य हलाहलाप्रमाणे पचवत या राणीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्राला जीवदान दिले. या रणरागिणीच्या तेजाने मोगल सल्तनतीचा अस्तकाळ जवळ येऊन ठेपला. महिषासुरमर्दिनीप्रमाणे ही राणी तेजस्विनी म्हणून मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाली. अखेरपर्यंत तिने आपली युक्ती, बुध्दी, शक्ती हिंदवी स्वराज्यासाठी पणास लावली.८६ वर्षाचे प्रदीर्घ आयुष्य आणि त्यातील ६१ वर्षाचा वैधव्याचा कालखंड हा तिने अखंडपणे स्वराज्याच्या सेवेसाठी खर्च केला.
ISBN No. | :1313 |
Author | :Dr Sadashiv Shivade |
Binding | :Paperback |
Pages | :126 |
Language | :Marathi |
Edition | :2014 |