akshardhara
Kavalyanchi Shala (कावळयांची शाळा)
Kavalyanchi Shala (कावळयांची शाळा)
Couldn't load pickup availability
आचार्य अत्रे यांची भूमिका या बहुतेक ’नवयुगवाचनमाले’ सारख्या क्रमिक पुस्तकातील पाठ म्हणून आचार्य अत्रे यांनी लिहिल्या होत्या. क-हेचे पाणी, खंड २ पॄ. १०६ वर त्यांनी या मागील आपली जी भूमिका दिली आहे, ती अशी- ...मुलांना भावी आयुष्यात उत्तम मराठी भाषा बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, एवढेच नव्हे तर ती नामवंत लेखक झाली पाहिजेत, प्रतिभाशाली कवी झाली पाहिजेत, ह्या एका दॄष्टीने धडयांची निवड केली होती. आधुनिक वाङमयात जे जे विविध प्रकार नि तंत्रे आली होती, त्याचा मोठया कौशल्याने... मी या गोष्टींतून उपयोग करून घेतलेला आहे. लहान मुले ज्या भाषेत बोलतात, त्याच घरगुती भाषेचा... मी सर्रास उपयोग केलेला आहे. प्रौढ माणसे बोलतात ती किंवा छापील पुस्तकांमध्ये जशी वापरतात तशी भाषा मुलांना वाचायला लावणे हे मानरशास्त्राच्या विरूद्ध आहे. वाचनात मुलांची झपाटयाने प्रगती व्हावी एवढयासाठी वाचताना ओळखीचे शब्द फिरून फिरून यावेत, एवढेच नव्हे, तर काही काही धडयांची भाषा कवितेच्या कडव्यासारखी रुणझुणती, नादमधुर नि तालबद्ध असावयाला हवी या कल्पनेने... मी धडे रचलेले आहेत.
ISBN No. | :9788186530363 |
Author | :Aacharya P K Atre |
Publisher | :Parchure Prakashan Mandir |
Binding | :Paper Bag |
Pages | :56 |
Language | :Marathi |
Edition | :2007/09 - 1st/1981 |
Share

