Skip to product information
1 of 2

akshardhara

Vishavrikshachi Chhaya (विषवृक्षाची छाया )

Vishavrikshachi Chhaya (विषवृक्षाची छाया )

Regular price Rs.72.00
Regular price Rs.80.00 Sale price Rs.72.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

"...विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, सुरेश खरे, शं. ना. नवरे इत्यादी सर्व नाटकारांपेक्षाही, ज्यांचे नाटयकर्तृत्व अधिक भव्य आणि लक्षणीय आहे, असा आजचा अग्रगण्य नाटककार म्हणजे वसंत कानेटकर होय. त्यांच्या नाटकांची एकूण संख्या लक्षणीय असली, तरी संख्येपेक्षा त्यांची नानाविधता व नाटयगुणवत्ता अधिकतर लक्षणीय आहे. प्रस्तुत संबंधात एक साधा प्रश्न विचारून बघण्यासारखा आहे, की ज्याने कानेटकारांप्रमाणे अनेक नाटयविशेषांत आपले विजयस्तंभ उभारून ठेवले आहेत, असा अन्य कोण नाटककार आहे? या एका बाबतीत तर अखिल मराठी नाटयेतिहासात त्याचे महत्त्व केवळ अनन्यसाधारण असे आहे. पूर्वोक्त आणि तत्पूर्व किर्लोस्कर, देवल, कोल्हाटकर, खाडिलकर, गडकरी हे सर्व नाटककार प्रायश: एकदेशी होते तर कानेटकर अनेकदेशी आहेत उदाहरणार्थ, ’मत्स्यगंधा’सारखे पौराणिक, ’रायगडाला जेव्हा जाग येते’सारखे ऎतिहासिक, ’प्रेमा तुझा रंग कसा?’सारखे सामाजिक, ’वेडयाचं घर उन्हात’सारखे मनोवैज्ञानिक, ’देवाचं मनोराज्य’सारखे काल्पनिक आणि ’हिमालयाची सावली’सारखे चारित्रिक, अशी अनेक व अनेकविध नाटके रचणारा अन्य कोण मोठा नाटककार आहे? आणि त्याशिवाय ट्रॅजिडी, कॉमेडी, ट्रॅजिककॉमेडी, फार्स इत्यादी सर्व नाटयप्रकारांत त्यांचे काही ना काही अजोड असे नाटयकर्तॄत्व आहेच. तेव्हा हा एक पराक्रमी नाटककार असा आहे की ज्याने मराठी नाटक पूर्वी कधी नव्हे इतक्या उंचीवर नेऊन पोचवले असे म्हणता येईल. ’कस्तुरीमृग’सारखी मराठी नाटकाला ललामभूत ठरेल, अशी एक अस्सल ट्रॅजिडी कानेटकरांनी लिहिली आहे. पूर्वकाळात एकूणच मराठी नाटकाची आणि येथे ’नाटकाची’ म्हणजे ’मराठी नाटयलेखनाची’ जी रड आणि परवड होती ती लक्षात घेता कानेटकरांचे नाटयलेखन केवळ विस्मयजनक आहे, असे म्हणता प्राप्त आहे..." माधव मनोहर (’मराठी नाटक थिटे का?’ रसरंग, दिवाळी अंक १९८८ मधून)
ISBN No. :9788171856718
Author :Vasant Kanetkar
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :92
Language :Marathi
Edition :1st/1976
View full details