1857 Bandatil Maharashtrachi Bhumika(१८५७ बंडातील महाराष्ट्राची भूमिका) By M.D. Devid, Vasanti Damle
1857 Bandatil Maharashtrachi Bhumika(१८५७ बंडातील महाराष्ट्राची भूमिका) By M.D. Devid, Vasanti Damle
Share
Author:
Publisher: Lokvangmay Grih Prakashan
Pages: 215
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
1857 Bandatil Maharashtrachi Bhumika(१८५७ बंडातील महाराष्ट्राची भूमिका)
Author : M.D. Devid
निदान दोन बाबतीत हे पुस्तक १८५७च्या लढ्याबद्दल नवा दृष्टिकोन व या महान लढ्याला समजून घेण्यात नवे परिमाण देते. एक म्हणजे लढ्याचे कारण व दुसरे म्हणजे लढ्याचे मुख्य प्रचारक. उठावाचे पहिले प्रमुख कारण होते छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांचे वंशज, साताऱ्याचे राजे प्रतापसिंग यांचे वैध व कायदेशीर हक्क डावलले जाणे. याव्यतिरिक्त पेशवे दुसरे बाजीराव यांचे कायदेशीर वारस नानासाहेब पेशवे यांना त्यांची कायदेशीर पेन्शन देण्यास ब्रिटिश सरकारने नकार देणे. मराठा नजरेतून जे कायदेशीर व हक्काचे होते त्या दोन्ही बाबी नाकारल्या जाणे मराठा गर्व, स्वाभिमान व मराठी अस्मिता यांना खोलवर दुखावून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ही मराठी अस्मिता मराठा संघर्षाचा, स्वातंत्र्य चळवळीचा पाया राहिली आहे. सगळ्याचा उगम या भावनेतून होताना दिसतो. त्यात भर पडली ब्रिटिशांच्या भारतविरोधी व शोषक प्रवृत्तीची, ज्यामुळे ही अस्मिता अधिक दडपली गेली. वहाबी चळवळ, बादशहा बहादूरशहा ज़फ़र आणि इतर भारतीय संस्थानिक व राजे या ब्रिटिशविरोधी असंतोषाच्या चळवळीत चपखल बसले. महाराष्ट्रातील डोंगरी आदिवासींनी या महान संघर्षात घेतलेल्या सक्रिय सहभागावर त्याचप्रमाणे या संघर्षकाळात मुंबईतील जनतेच्या अत्यंत क्लेशकारक अनुभवांविषयी व मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन याने मुंबई प्रांताचा बचाव करण्यासाठी जी प्रशासकीय पावले उचलली त्याचा सविस्तर परामर्श प्रथमच या पुस्तकात घेतला आहे.