Bhutacha Janma (भुताचा जन्म)
Bhutacha Janma (भुताचा जन्म)
Author: D. M. Mirasdar
Publisher: Mehta Publishing House
Pages: 132
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
...ही भुते कुठेही असू शकतात. ती अमक्या ठिकाणी नाहीत, असे कुणालाही छातीवर हात ठेवून सांगता यायचे नाही. साधारणपणे सांगायचे म्हणजे ती कुठल्याही पडक्या वाड्यात, विहिरीत, मसणवटीत असतातच. विशेषत: विहिरीत हडळ असते आणि ती सुंदर बाईचे रूप घेऊन इकडे-तिकडे हिंडत असते. पिंपळावर तर मुंजा हटकून असतो आणि वड, पिंपरणी, लिंब असल्या झाडांवरही भुते माकडासारखी गर्दी करून बसलेली असतात. दिवसा ती काही करीत नसली, तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते. त्या वेळी मात्र ती कुठेही आणि कुणाच्याही वेषात भेटतात. त्यांचे पाय उलटे असतात असे म्हणतात; पण तसे काही त्यांच्यावर बंधनच आहे असे नाही. अमावस्येच्या रात्री तर ती हमखास फिरायला निघालेली असतात. अशा वेळी त्यांच्यासंबंधी काहीही बोलणे अगर त्यांच्या दृष्टीस पडणे, हे धोक्याचे असते.
ISBN No. | :9788184984682 |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :126 |
Language | :Marathi |
Edition | :2013/04 - 6th/1958 |