akshardhara
Pangal (पानगळ)
Pangal (पानगळ)
Couldn't load pickup availability
‘पानगळ या नवीन पुस्तकात मिलिदं जोशी यांच्यातील कथाकाराचे उत्कटतेने दर्शन घडते. या कथासंग्रहातील बहुतेक कथा या अस्वस्थ माणसांच्या अनुभवातून स्फुरलेल्या असल्या तरी या कथांमध्ये अभिव्यक्त झालेले अनुभव हे एकसुरी नाहीत. प्रत्येक कथेतील अनुभव पृथगात्म आहे. बहुतांश कथांमध्ये मानवी मनाच्या गुहेतले गूढ उकलण्याचा प्रामाणिक प्रयत्न मिलिदं जोशी यांच्या लेखणीने केलेला आहे. मनाचा थांग शोधण्याची लेखकाची अनावर ओढ पानगळ मधील ब-याच कथांमधून प्रतीत होते. अलीकडच्या कथासाहित्यात सुगमता आणि आनुषांगिक वाचनीयता ही पुष्कळदा अभावानेच आढळते. पण प्रस्तुत कथासंग्रह हा त्याला अपवाद आहे. त्यामुळे या कथा वाचून पूर्ण केल्याशिवाय वाचक सहसा खाली ठेवणार नाही आणि त्यानंतरही त्याच्या मनात या कथा घोळत राहतील. लेखकाला तरी यापेक्षा अधिक काय हवे असते
ISBN No. | :9789380639697 |
Author | :Pra Milind Joshi |
Publisher | :Sanskruti Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :168 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2012 |
Share

