Magil Panavarun Magech (मागील पानावरून मागेच)
Magil Panavarun Magech (मागील पानावरून मागेच)
Low stock: 3 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तपशीलवार, शिस्तबद्ध व तथ्यांनी युक्त असे संशोधनात्मक लिखाण हे बरेचदा वाचनीय नसते. परंतु या पुस्तकात अरुण शौरी यांनी तथ्य, आकडेवारी, विधाने आणि निकाल यांवरचे भाष्य कौशल्याने कथन केले आहे. ‘नोकरी आणि शिक्षण या क्षेत्रांमधले आरक्षण’ हा विषय कैक वर्षे विवादास्पद आहे. १९८९मध्ये पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाचा अहवाल उचलून धरल्यापासून आरक्षण हा विषय भारताच्या सामाजिक, तसेच राजकीय क्षेत्रांत वादग्रस्त ठरला आहे. परंतु खरेच त्यामुळे आरक्षणामागचा मूळ हेतू साध्य झाला आहे का? या पुस्तकात शौरी हे खोलात संशोधन करून आरक्षणासंदर्भातल्या एकेका तपशिलाकडे लक्ष वेधतात आणि त्यांची मते मांडतात. यासोबतच ते सुप्रीम कोर्टाचे आरक्षणाच्या बाजूने दिलेले निकाल व त्यांचे विश्लेषण वाचकांसमोर ठेवतात. भारतीय समाजाला लागलेल्या जातिभेदाच्या रोगावरचा आरक्षण हा उपाय आहे, असे मानणार्यांसाठी हे पुस्तक म्हणजे सणसणीत टोला आहे.
ISBN No. | :9788184984804 |
Author | :Arun Shourie |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Ashok Padhye |
Binding | :Paperback |
Pages | :450 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2013 |