Skip to product information
1 of 2

Chatakdar 5 + 1 (चटकदार- ५+१)

Chatakdar 5 + 1 (चटकदार- ५+१)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सहा चटकदार नाटिकांचा हा संग्रह!... या नाटिका वाचण्यासाठी तर आहेतच, पण रंगमंचावर सादर करण्यासाठी देखील आहेत. ‘रंगमंचा’वर म्हणताच, एकदम मोठ्या नाट्यगृहाचे सुसज्ज स्टेज डोळ्यांसमोर उभे राहिले ना?... तिथे प्रयोग करता आला तर काय, मज्जाच! पण नाही आला, तरी हिरमुसले होण्याचे कारण नाही! कुठेही केले तरी नाटक हे नाटकच असते! कुठेही म्हणजे, शाळेच्या वर्गात, शाळेच्या हॉलमध्ये, बागेत, घराच्या गच्चीवर, कॉलनीच्या हॉलमध्ये...कुठेही! ते रंगतदार व्हावे, यासाठी फक्त तीनच गोष्टी लागतात. एक, एखादी सांगण्यासारखी (नाटकरुपातील) गोष्ट, ती करुन दाखवणारी गुणी नटमंडळी आणि ती प्रेक्षकांच्या मनाला भिडावी, यासाठी नेमके काय करावे, हे समजू शकणारा डोकेबाज ‘दिग्दर्शक’! ...आपल्याकडची ‘बुध्दिमान’ मंडळी म्हणतात, की मुलांना जादू, पर्‍या, राजाराणी, देवदूत, राक्षस, असले काही नका सांगू. वास्तव सांगा. त्यांचे एवढेच चुकते, की त्यांना कल्पनाविलासामागचे वास्तव दिसत नाही... दुसर्‍यांची घरे, जमिनी, पैसा गिळंकृत करणारे राक्षस आपल्या आजूबाजूला नाहीत का? आणि राक्षस आहेत त्या अर्थी देवदूतही आहेत. समाजाची सेवा करणारे संतही आहेत. - रत्नाकर मतकरी
ISBN No. :9788192723563
Author :Ratnakar Matkari
Publisher :Navachaitanya Prakashan
Binding :Paperback
Pages :104
Language :Marathi
Edition :2013/08 - 1st
View full details