Gharate (घरटे)
Gharate (घरटे)
Share
Author:
Publisher:
Pages: 41
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मराठी साहित्यातील श्रेष्ठ लेखक कै. वि. स. खांडेकर यांचा ‘घरटे’ हा खास बाल-कुमारवयातील मुलांसाठीचा कथासंग्रह. या उमलत्या वयात मुलांचं मन अत्यंत संवेदनक्षम असतं. कुटुंबातील माणसं, मित्रमैत्रिणी, शाळा, शिक्षक, इतकंच नव्हे, तर झाडं-पानं-फुलं, नद्या, डोंगर, आकाश, चांदण्या या निसर्गाशीही त्यांचं जिवाभावाचं नातं जडलेलं असतं. या नात्यांचे, भोवतालच्या वातावरणाचे, घडामोडींचे त्यांच्या मनावर विविधरंगी तरंग उमटत असतात. त्यातून उमलतात त्यांच्या जाणिवा आणि निर्माण होतात अनेक समज-गैरसमज आणि प्रश्नचिन्हं! या कथांत वि. स. खांडेकर यांनी लहान मुलांच्या याच भावविश्वाची अकृतिम शैलीत, अतिशय तरल चित्रं रेखाटली आहेत. मुलांच्या भावभावना व त्यातले सूक्ष्म बारकावे टिपताना त्यांची लेखणी खूप हळुवार होते आणि त्यांच्या मनावर अलगद जीवनातील शाश्वत मूल्यं आणि आदर्श यांचा ठसा उमटवते. खळबळ माजलेल्या अथांग सागरात आपली छोटीशी होडी ‘सत्व’ सांभाळून कशी हाकारून न्यायची, ही जाणीवच जणू या कथांतून फुलते.
ISBN No. | :9788177662309 |
Author | V S Khandekar |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :41 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |