Skip to product information
1 of 2

Bokya Satabande 6 to 7 (बोक्या सातबंडे ६ ते ७ )

Bokya Satabande 6 to 7 (बोक्या सातबंडे ६ ते ७ )

Regular price Rs.252.00
Regular price Rs.280.00 Sale price Rs.252.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून ’हसवाफसवी’तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, ’चौकटराजा’ मधल्या नंदू आणि ’श्रीयुत गंगाधरे टिपरे’तल्या आबांपासून ’लगे रहो मुन्नाभाई’मधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वॄत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मिस्किल नि खटयाळ बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुदकन हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! ’गुगली’, ’नवी गुगली’, ’हसगत’, ’कागदी बाण’ व ’झुम’ नंतरचं प्रभावळकरांचं ’बोक्या सातबंडे’ हे एक झकास पुस्तक! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.

ISBN No. :9788174345400
Author :Dilip Prabhavalkar
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paper Bag
Pages :131
Language :Marathi
Edition :2012/07 - 1st/2011
View full details