akshardhara
Rashtrapati ( राष्ट्रपती )
Rashtrapati ( राष्ट्रपती )
Couldn't load pickup availability
लेखकांनी आपल्या ग्रंथात केलेल्या सर्व तेरा राष्ट्रपतींना मी जवळून पाहिले आहे. त्यापैकी काहींबरोबर काम करण्याचे सौभाग्यही मला लाभले आहे. डॉ. मेहेंदळेंच्या या पुस्तकात मला या सर्व व्यक्तिंविषयी बरीच माहिती मिळाली त्याचबरोबर जुन्या आठवणीही जाग्या झाल्या. राष्ट्रपती हा ग्रंथ सादर करून त्यांनी भारताच्या पासष्ट वर्षांच्या इतिहासाचे दर्शन घडविले आहे. त्यांनी जे विश्लेषण केले आहे ते वाचनीय तर आहेच पर्म्तु या पदावरील व्यक्तिंची निवड कशी केली जाते आणि त्यांची कर्तव्ये काय हा भाग अभ्यासकांना फार उपयुक्त ठरेल असे मला वाटते. पासष्ट वर्षांत राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या या व्यक्तींनी एखाद दुसरी अपवादात्मक घटना वगळता आपापल्या परीने भारताची शान व मान नुसती राखलीच नाही तर ती वृध्दिंगत केली आहे असा निष्कर्ष या पुस्तक वाचनातून निघतो.
Author | :Dr Vishvas Mehendale |
Publisher | :Anubandh Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :270 |
Language | :Marathi |
Edition | :2014 |
Share

