Anandameva (आनंदमेवा)
Anandameva (आनंदमेवा)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आनंदमेवा : लेखिका डॉ. लता काटदरे यांनी बालवयांतील मुलांच्या संगोपनाबाबत एक वेगळा प्रयोग केला. या मुलांच्या पालकांच्या मदतीनं त्यांनी एक निवांत, सहृदय आणि संवेदनशीला समाज त्या पालकांच्यातून साकारायला सुरुवात केली.पालकांच्या ठायीची उपजत संवेदनशीलता आणि सर्जनशीलता यांना चालना देत वेगवेगळ्या उपक्रमांतून मुलांच्या वाढीसाठी त्यांनी आधी आनंददायक वातावरण तयार केलं. त्या वातावरणात मग परस्परांना आपुलकीने स्वीकारत, एकमेकांवर प्रेम करत मुलं, त्यांचे आईबाबा आणि स्वत: लेखक यांचा सहप्रवास सुरू झाला. तो सर्वांसाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि प्रत्येकाच्या जाणिवा प्रगल्भ करणारा होत गेला. आज ही मुलं किशोरवयात आली आहेत. त्यांना लाभलेल्या निकोप संगोपनाचे परिणाम त्या मुलांच्या वृत्तीतून, आवडीनिवडीतून आणि वर्तनातून आता स्पष्ट दिसू लागले आहेत. ही मुलं आणि त्यांचे पालक यांची जीवनशैली, सहवास सर्वांनाच आनंदित करतो आहे. त्या सहप्रवासाचा हा आलेख.
ISBN No. | :9789350910870 |
Author | :Dr Lata Katdare |
Publisher | :Mauj Prakashan Gruha |
Binding | :Paperback |
Pages | :206 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2014 |