Skip to product information
1 of 2

akshardhara

Shri Venkateshvar Ani Shri Kalahastishvar ( श्रीवेंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर )

Shri Venkateshvar Ani Shri Kalahastishvar ( श्रीवेंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर )

Regular price Rs.540.00
Regular price Rs.600.00 Sale price Rs.540.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 383

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

आंध्रमधील तिरुमलै अथवा सप्तगिरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या पर्वतावर श्रीवेंकटेश हा देव नांदतो आहे. हा केवळ भारतातीलच नव्हे, तर सा-या जगातील अत्यंत श्रीमंत देव आहे. महाराष्ट्रातील पंढरपूरचा श्रीविठ्ठल, ओरिसातील पुरीचा श्रीजगन्नाथ आणि आंध्रप्रदेशातील तिरुमलैचा श्रीवेंकटेश हे वैष्णवांचे तीन देव अत्यंत लोकप्रिय आहेत; ते ख-या अर्थाने लोकदेव आहेत. या तिघांचीही उन्नयनप्रक्रिया भारताच्या सांस्कॄतिक घडणीत लक्षणीय ठरलेली आहे. वेंकटेशाचे महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचे नाते आहे. या नात्याचा शोध हा आंतरभारतीय , विशेषत: दक्षिण भारतीय सांस्कृतिक अनुबंधाच्या दॄष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. वेंकटेशाने महाराष्ट्र आणि दक्षिण भारत यांच्यामध्ये संस्कृतीचे सेतुबंध निर्माण केले आहेत. आणि या भावसंपन्न सेतुबंधांचे महिमान उभय प्रदेशांतील लोकमानसाच्या बळकट श्रद्धांत स्थिरावलेले आहे. परंतु सांस्कृतिक इतिहासाच्या क्षेत्रात आजवर त्याची सामग्र्याने नोंद झालेली नाही. तशी ठसठशीत नोंद होणे आणि सामाजिक-सांस्कृतिक विघटनापासून सत्त्वशील समाजाला वाचवणे. हे विधायक दृष्टीच्या इतिहासकारांचे कर्तव्य आहे.

ISBN No. :9788186177808
Author :R C Dhere
Publisher :Padmagandha Prakashan
Binding :Hard Bound
Pages :383
Language :Marathi
Edition :2011/07 - 1st/2011
View full details