Navi Pahat (नवी पहाट)
Navi Pahat (नवी पहाट)
Share
Author:
Publisher:
Pages: 200
Edition:
Binding:
Language:
Translator:Pradnya Oak
या पुस्तकात सामान्य माणसांच्या आयुष्यातल्या अनेक प्रश्नांना, अत्यंत साध्या भाषेत, छोटया छोटया विनोदांचा आधार घेऊन ओशोंनी उत्तरं दिलेली आहेत. ती उत्तरं सर्वांसाठी आहेत. अनेक प्रकरणामधले त्यांचे विचार हे आताच्या, विसाव्या-एकविसाव्या शतकातल्या विचारांच्याही कितीतरी पुढचे विचार आहेत. त्यांतली काही विधानं आज तंतोतंत खरी झालेली पाहायला मिळतात. आपलं रोजचं जीवन, पुनर्जन्म, ध्यानधारणा, स्वत:तला अहंकार, इ. गोष्टीवरची प्रकरणं आवर्जून वाचावीत, अशी आहेत. या पुस्तकात ध्यानधारणेच्या दॄष्टीनं त्याच्या आड येणा-या मनाच्या काही वाईट सवयींबाबत ओशोंनी अतिशय सुंदर विश्लेषण केलेलं आहे... ’आधुनिक माणसाची’ विशिष्ट कल्पना त्यांनी मांडली आहे. ती मांडताना समाजातल्या काही विशिष्ट परंपरा, मनोधारणा, रूढी, मनावरचा पगडा आणि परंपरेनं घट्ट रूतलेल्या समजुती यांतले उघड उघड दिसणारे दोष अत्यंत सडेतोडपणानं आणि निखळ प्रांजळपणानं ओशोंनी आपल्यासमोर ठेवलेले दिसतात... त्यांचे शिष्य असो, कोणत्याही थरातल्या माणसाला या ’आधुनिक माणसाची’ त्यांनी मांडलेली कल्पना निश्चितच अंतर्मुख करील, यात शंका नाही. प्रत्येक वाचकानं स्वत:ला चाचपून, तपासून पाहावं आणि वागावं. अशी अपेक्षा ओशो करत नसले, तरीही हे पुस्तक वाचल्यानंतर या गोष्टी आपोआप घडतील, ही खात्री आहे.
ISBN No. | :9788177666177 |
Author | :Osho |
Translator | Pradnya Oak |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :200 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |