Adhunik Pravachane ( आधुनिक प्रवचने )
Adhunik Pravachane ( आधुनिक प्रवचने )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आधुनिक प्रवचने बालमित्रांसाठी हे पुस्तक बालवाचकांच्य हाती देताना आज आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आजच्या पिढीतील संगणकीय युगातील मुलांमुलींना प्रवचने या शब्दाचा अर्थ कृतीतून स्पष्ट करून दाखविण्याच्या हेतूने या पुस्तकाचे लेखन आम्ही केले आहे.
प्रत्येक प्रवचनातील ओवीच्या स्पष्टीकरणासाठी बोधप्रद गोष्टी, प्रेरणादायी चरित्रे, मराठी व हिंदी भाषेतील अभिजात कवितांचे संदर्भ आम्ही दिले आहेत. तसेच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील विचारांचा आजच्या विज्ञानयुगाशी व आपल्या दैनंंदिन जीवनाशी कोणता संबंध आहे याचे विवरणही या प्रवचनांमधून आम्ही केले आहे. बालवाचकांच्या संस्कारक्षम मनाला पोषक ठरणारे संदर्भ आम्ही या प्रवचनांमधून जाणीवपूर्वक दिले आहेत.
बालमित्रांनी दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे। या समर्थ वाणीप्रमाणे आपली वाचनाची आवड जोपासावी, नोंदी कराव्यात, संकलन करावे व स्वत:ची अभिव्यक्ती कौशल्य वाढवावीत हा व्यापक दृष्टिकोनही या लेखनामागे आहे.
Author | :Shailaja Mukund Sabanis |
Publisher | :Anushri Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :156 |
Language | :Marathi |
Edition | :2016 |