Audyogik Annapurna (औदयोगिक अन्नपूर्णा)
Audyogik Annapurna (औदयोगिक अन्नपूर्णा)
Low stock: 4 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तुम्हाला नेहमी कॅंटिनमध्ये जेवावं लागतं का? तर मग हे वाचा! औदयोगिक व्यवसायांत मनुष्यबळ हे फार महत्त्वाचं भांडवल असतं. हे भांडवल सुरक्षित राखण्यासाठी औदयोगिक व्यवस्थापनात अनेक तरतुदी केल्या जातात. कामाच्याच ठिकाणी जेवणखाण मिळण्याची सोय ही त्यांपैकीच एक. पण कालांतराने ही सोय गृहीत धरली जाऊ लागली आणि त्यातील मागण्या वाढत गेल्या. अन्नाला पैशांच्या तुलनेत जोखलं जाऊ लागलं. साहजिकच त्यातील मूळ उद्देश मागे पडू लागला. वास्तविक अन्न ही शरीरावर मूलभूत गरज. पण अन्न हे दुधारी शस्त्र आहे. चुकीची हाताळणी आणि अयोग्य निवड झाली तर अन्न शरीरावर उलटतं. औदयोगिक कर्मचा-यांच्या बाबतीत कळत-नकळत हेच घडतं गेलं. कंपनीच्या वैदयकीय तज्ज्ञांच्या लक्षात ही चूक यायला लागली आणि त्यांनी आहारतज्ज्ञांनी मागणी करायला सुरुवात केली. या मागणीतून सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. मालती कारवारकर यांचा प्रवेश काही प्रथितयश उदयोगसमूहांत झाला. त्यांच्या विषयाला एक नवीन आव्हान मिळालं. त्या अनुभवांतूनच साकारली- औदयोगिक अन्नपूर्णा!
ISBN No. | :9788186150250 |
Author | :Dr Malati Karvarkar |
Publisher | :Menaka Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :74 |
Language | :Marathi |
Edition | :2000/03 - 1st/2000 |