Nag Ani Namune (नग आणि नमुने)
Nag Ani Namune (नग आणि नमुने)
Out of stock
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
व्यक्ती आणि वल्ली वाचल्यानंतर एका वाचकान पु लं ना प्रश्न केला होता, ही पात्र जिवंत होऊन तुम्हाला भेटली, तर तुम्ही काय कराल? मी कडकडून भेटेन त्यांना! पु. ल. उत्तरले होते. माझ सुदैव अस, की या माझ्या पुस्तकातल्या नग आणि नमुन्यांना मी प्रत्यक्षात भेटलो आहे. तेही अगदी भरभरून! त्यांच्याबरोबर उठलो बसलो आहे; हसलो रुसलो आहे! लग्नाच्या वराती, मुद्दाम चुकीच्या कार्यालयाकडे वळवण्याच वेड असलेला वश्या दामले, हमखास डुबतील अशा योजना आखण्यात बुडालेला वेडा फाटक, हातातल्या इस्त्री पेक्शःआ स्त्री च्या हाताकडे लक्ष असणारा बनसोडे ड्रेपरीवाला, असंख्य नाटकांतल्या घरगड्या चा मेन रोल करणार डीपक दंडवते, साक्षात देवसुध्दा चॅप्टरगिरी करतात म्हणून सात्त्विक संतापणारा रंगा लिखिते, रिक्षाच्या आरशात अख्ख्या जागाच प्रतिबिंब पाहणारे रिक्षावाले मेढेकर, कुठलाही किरकोळ प्रश्न तत्त्वाचा करून भांडण्यात तरबेज असलेले विसुभाऊ चिरमुले, सुपारीची खांडे तोंडात टाकावीत तसे बोलण्यात स्वल्पविराम टाकणारे अण्णा बोरकर किल्ली, पाकिट सोडाच स्वत:च्या बायकोलाही विसरून येणारे पाटोळे सर, हनिमून च्या वेळीही हिशेब लिहिताना महिरणारा लिमये बी.कॉम., होतकरू प्रेमिकांची टूटती दिल जोडणारा गणा गायधनी, गीतेतली स्थितप्रज्ञा ची सगळी लक्षण मोडीत काढणारा नंदू घोमण, अखेरचा श्वास घेत असलेल्या तात्याकडेही जन्माचा दाखला मागणारा दाखला मामू.. हे सगळे साक्षात परमेश्वरान पृथ्वीतलावर धाडलेले आणि आपल्या मराठी मातीत तरारलेले जिवंत नग आणि नमुने आहेत.
ISBN No. | :4422 |
Author | :Shivraj Gorle |
Binding | :Paperback |
Pages | :249 |
Language | :Marathi |
Edition | :2014 |