Gangajali (गंगाजळी)
Gangajali (गंगाजळी)
Share
Author:
Publisher:
Pages: 200
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
प्राचीन मराठी वाडमयाचे, वाडमयकरांचें, वाडमय व्यवहाराचें आणि वाडमय- संशोधनाचें दर्शन घडविणा-या पंधरा लेखांचा आणि अकरा शोधशलाकांचा हा संग्रह- ’गंगाजळी’. यांत मराठीच्या महामंडपात झालेल्या, हरिहरांच्या प्रीतिभेटींचें दर्शन घडत आहे; विठा रेणुकानंदन. जनी जनार्दन आणि रामा जनार्दन या एकनाथ-पंचायतनांतल्या तीन संतकवींच्या चरित्रमूर्तीचें अनावरण होत आहे; वारकरी-धारकरी वादांत संवाद घडविण्यासाठी हरिबुवा भोंडव्यांसारखे संत मराठी जनांपुढे उभे राहत आहेत; शिष्यपरंपरेच्या व्दारां महाराष्ट्राबाहेरच्या मठमंदिरांत पूजाविषय बनलेले ज्ञानदेव आणि ग्रंथांच्या व्दारां सातां समुद्रांपार पोचलेले महीपति मराठीच्या प्रभावाचा डंका झडवीत आहेत; आणि नामदेवांच्य भावकोमल अभंगाचे नि मध्वमुनींच्या नादमधुर पदांचे सौंदर्य ओसंडत आहे. महाराष्ट्रांतल्या मुद्रणपूर्व ग्रंथव्यवहाराची आणि राजवाडेयुगांत राष्ट्रीय उत्थानाच्या प्रेरणेनें घडलेल्या वाडमय संशोधनाची येथे सादर केलेली साघन्त साधार कहाणी वेधक, प्रबोधक नु प्रेरक ठरावी. यांशिवाय या संग्रहांत अनेक अज्ञात कृति , कर्ते नि तत्संबद्ध स्थानें उजेडांत आणलीं आहेत.
ISBN No. | :4713 |
Author | :R C Dhere |
Publisher | :Nilkantha Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :200 |
Language | :Marathi |
Edition | :1972/01 - 1st/1972 |