akshardhara
Bhokarwadichya Goshti (भोकरवाडीच्या गोष्टी)
Bhokarwadichya Goshti (भोकरवाडीच्या गोष्टी)
Couldn't load pickup availability
विहिरीत रॉकेल सापडल्यावर ‘बॉम्बे हाय’ सारखी ‘भोकरवाडी हाय’ कंपनी स्थापन करून निवांत जगण्याचं स्वप्नं पाहणारा शिवा जमदाडे अन् त्याची कट्टा कंपनी. गुप्त धनाच्या शोधात कुलंगडी शोधणारा नाना चेंगट. साताठ कणसं, शेंदाडं अन् चरवीभर दूध यासारखं बरंच काही उपोषणाच्या आदल्या दिवशीच रिचवणारा बाबू पैलवान. खव्याचा गोळा विकून आलेल्या पैशातनं बायकोला सिनेमा दाखवायचं आमिष देणार्या बापूची झालेली तर्हा.. चावलेल्या कुत्र्याच्या पाळतीवर फिरणार्या नाना चेंगटाला त्या कुत्र्यानंच कसं बिंगवलं.. बावळेमास्तरांना तपकिरीचं व्यसन सोडण्याचा दम देणार्या हेडमास्तरांनी पुन्हा परवानगी कशी दिली.. भोकरवाडीतल्या अशा गावगन्ना, बेरकी, छत्री अन् इरसाल पात्रांच्या पोट धरधरून हसायला लावणार्या आणि द. मा. मिरासदारांच्या लेखणीतून उतरलेल्या खुसखुशीत कथा तुम्ही वाचायलाच हव्यात!
ISBN No. | :9788184982299 |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :1983/2012/10 - 5th |
Share

