Skip to product information
1 of 2

Punha Yadonki Barat (पुन्हा यादोंकी बारात)

Punha Yadonki Barat (पुन्हा यादोंकी बारात)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 181

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

‘पुन्हा यादोंकी बारात’ वाचून झाल्यावर - खरं म्हणजे वाचन चालू असतानाच - माझी पहिली प्रतिक्रिया होती थक्क होण्याची. ‘मराठी भाषेतून हिंदी चित्रपट या बाजारू समजल्या गेलेल्या विषयासंबंधात इतके दर्जेदार, अभ्यासपूर्ण, शैलीबाज, वाचनीय ललित लेखन होत असेल हे माझ्या गावी नव्हते. शिरीष कणेकरला हिंदी चित्रपटांविषयी व त्यातील कलावंतांविषयी मनापासून प्रेम आहे, ही गोष्ट मला सगळ्यात महत्त्वाची व स्वागतार्ह वाटते. त्यामुळे इथल्या व्यक्तींची शब्दचित्रे रंगवताना त्याच्या लेखणीला आपोआपच हळुवार ओलावा येतो. ग्लॅमरच्या झगमगाटामागे दडलेला काळोख त्याला दिसतो. कलाकाराच्या हृदयातली वेदना त्याला जाणवते. एखाद्या सुंदर चित्रपटात रंगून जावे तसा मी रंगून गेलो. शिरीषच्या लेखणीतील भावुकता मला भावते. मला हळवा करते. इतकी वर्षे फिल्म इंडस्ट्रीत काढल्यानंतरही मी आतून थोडा हलल्यासारखा झालो. ग्लिसरीनशिवाय डोळ्यात पाणी येत नाही, ही माझी समजूत खोटी पडली. - राजेश खन्ना यांच्या प्रस्तावनेतून
ISBN No. :9788174240225
Author :Shirish Kanekar
Publisher :Raja Prakashan
Binding :Paper Bag
Pages :181
Language :Marathi
Edition :2012/12/26 - 3rd/1995
View full details