Skip to product information
1 of 2

akshardhara

Ek Roop Anek Rang (एक रूप अनेक रंग )

Ek Roop Anek Rang (एक रूप अनेक रंग )

Regular price Rs.9.00
Regular price Rs.10.00 Sale price Rs.9.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एक रूप अनेक रंग ही देखील एक प्रेमकहाणीच आहे. परंतु या नाटकातील प्रणयभावनेचा प्रवास काही एका खोल अनुभवचिंतनातून व्यक्त झाला आहे. पतिपत्नीच्या प्रणयातील कोणत्याही रूपात स्वामित्व आणि समर्पण हे दोन रंग आढळतात. स्वामित्व ही समर्पणाची पूर्वावस्था आहे- ती पूर्वतयारीच असते. या अवस्थेतून सा-यांना- प्रत्येकालाच जावं लागतं. ती ओलांडणं ज्यांना जमते ते समर्पणाच्या प्रदेशात प्रवेश करतात. ज्यांना ती सहजतेने ओलांडण जमत नाही त्यांना मग तेच दोर काचायला लागतात. कोवळया लवीचं काटयांत रूपांतर व्हावं आणि गळून न पडलेले ते कोट झाडांनाही खुपावेत तसं होतं. त्यांचं मग हे जीव त्या काटयांच्या ओरखडयांनी एकमेकांना रक्तबंबाळ करत दुखावतात, दुरावतात, तुटतात, आपल्या ओरखडयांचंच प्रदर्शन मांडतात. स्वामित्वाच्या या नशेत माणसं बेसावधपणानं नको नको ते पणाला लावीत सुटतात- आपलं माणूस सुद्धा! भान आल्यावर जाणीव होते ती केवळ हरल्याची नव्हे- सर्वस्वी हरवल्याचीही! मग हे काटे गळतात- आपोआप गळून जातात. प्रेमाची ताकद जाणवायला लागते. प्रेमाशिवाय जगणं शून्य होतंय हे कळायला लागतं. प्राणनिष्ठा जाग्या होतात. झालेल्या सगळया सगळया वजाबाक्यांसह पुन्हा मनाची जुळणी नव्यानं होते स्वामित्वाला सहजपणे समर्पणाचं पुष्प येतं. इथून पुढं प्रेमाला तपाचं रूप येतं. ते एक भक्तीचं ऎश्वर्य बनतं. स्वामित्वापासून समर्पणापर्यंत मनामनांचा होणारा हा प्रवास म्हणजेच ’एक रूप अनेक रंग’

ISBN No. :6702
Author :Vasant Kanetkar
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :85
Language :Marathi
Edition :1st/1978
View full details