Beiman (बेइमान)
Beiman (बेइमान)
Out of stock
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ज्यॉं आनुई या फ्रेंच नाटककाराने ’बेकेट’ हया आपल्या नाटकात मित्रप्रेमाचे जे वेधक चित्र रंगविले आहे त्याचे प्रतिबिंब इतर भाषांप्रमाणे मराठीतही उमटले आहे. ’बेकट’चे भाषांतर वि. वा. शिरवाडकर यांनी केले, तर वसंत कानेटकर यांच्या ’बेइमान’चे उगमस्थान तिथेच सापडले. उदयोगपती धनराज याला आपला बालमित्र चंदर याच्याबद्दल वाटणारे अपार प्रेम आणि आपल्याच सूचनेवरून चंदरने कामगारांचे नेतॄत्व स्वीकारल्यावर दोघांमध्ये निर्माण झालेला संघर्ष हा या नाटकाचा केंद्रबिंदू. धनराज चंदरमधे आपले स्वरूप प्रकर्षाने पाहतो. आपले गुणदोष तो अधिक रेखीव स्वरूपात चंदरमधे शोधीत असतो. म्हणूनच याचे आत्मप्रेम आणि स्वत:विषयीचा तिटकारा याचे पर्यवसान चंदरवरील प्रेम-व्देष अशा दुहेरी संबंधात होते हा या नाटकाचा विलोभनीय विशेष. नाटकाची रचना, संवाद आणि पात्रांचा विकास हया सर्व बाबतीत कानेटकर यशस्वी आहेतच. हया नाटकाला मालक-मजूर संबंधाची पार्श्वभूमी लाभल्यामुळे वेगळेच परिणाम लाभले आहे.
ISBN No. | :9788171851800 |
Author | :Vasant Kanetkar |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :96 |
Language | :Marathi |
Edition | :1st/1973 |