Skip to product information
1 of 2

akshardhara

Kayapalat (कायापालट )

Kayapalat (कायापालट )

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
श्री. बाबा भांड यांचा, अकरा लघुकथांचा समावेश असलेला हा पहिलाच कथासंग्रह. श्री. भांड यांनी आजपर्यंत विविध प्रकारचे लेखन केले आहे. कॅनडातील जम्बोरीच्या निमित्ताने घडलेल्या जगप्रवासाचे व ठिकठिकाणी भेटलेल्या नाना स्वभावाच्या व्यक्तींच नेटके वर्णन करणारा त्यांचा ’लागेबांधे’ हा ग्रंथ वाचकांच्या आजही स्मरणात आहे. ’काजोळ’ हे आत्मपर लेखन आणि ’जरंगा’ ही ग्रामीण पाश्र्वभूमीवरची कादंबरीही वाचकांच्या लक्षात राहिली आहे. ’पांगारे’ हे त्यांचे छोटेखानी पुस्तक त्यांच्या शैलीदार ललितगदयाचा अत्युत्कॄष्ट वाणावळा आहे. ’कायापालट’ या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहाच्या निमित्ताने ते कथाकार या भूमिकेत वाचकांपुढे येत आहेत. मानवी मनाचा अचूक वेध घेणारी सूक्ष्म दॄष्टी, कथानकाचा ओघ उत्कंठपूर्ण ठेवणारी चित्रमय निवेदनशैली, मोजक्या व नेमक्या शब्दांत व्यक्त होणारे व कथा फुलवत ठेवणारे अर्थपूर्ण संवाद आणि या सर्वांचा एकरस मेळ घालणारे सुजाण वाडमयीन भान श्री. भाण्डांच्या या कथांतून पदोपदी जाणवत राहते. हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीला उतरले, अशी खात्री आहे.
ISBN No. :9788177867909
Author :Baba Bhand
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :112
Language :Marathi
Edition :2013 - 1st/1988
View full details