Shodhyatra (शोधयात्रा)
Shodhyatra (शोधयात्रा)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मनुष्य जेव्हा यशाचा शोध घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा त्याचे आप्तस्वकीय त्याचं कौतुक करतात. तो एखाद्या पदाचा, खुर्चीचा शोध घ्यायला लागतो, तेव्हा त्याच्या शेजार-पाजारचे लोक त्याला प्रोत्साहन देतात. एखाद्या कलेत प्रावीण्य मिळवण्याच्या प्रयत्नात त्याचे मित्र, शिक्षक त्याचं मनोबल वाढवायला मदत करतात. तुम्ही जर कुणाला सांगायला लागलात की, मी करोडपती व्हायला निघालो आहे, तर लोक म्हणतील, ‘वा, मग आम्ही तुम्हाला टीव्हीवर बघू.’ करोडपती बनायला निघालेल्या व्यक्तीचं टाळ्या वाजवून अभीष्टचिंतन करायला सगळे तयार असतात. तुम्ही राष्ट्रपतिपदाची इच्छा धरून निघालात, तर विरोधी पक्ष वगळता देशभरचे लोक तुमचं स्वागत करायला तयार असतात. लंकेचं राज्य मिळवायला, लंकापती व्हायला निघालात, तर सगळी सेना तुमच्या पाठीशी असते. नुसतेच पती बनायला निघालात, तर अख्खं वर्हाड तुमच्या पाठीमागे तयार असतं. भारतसुंदरी वा विश्वसुंदरी बनायला निघा, लोक टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करायला, तुम्हाला प्रोत्साहन द्यायला पुढे येतील. मात्र तुम्ही ‘प्रत्यक्षात जे आहात’ ते बनण्यासाठी, प्रोत्साहन द्यायला कुणीही पुढे येणार नाही. तुम्ही शोधयात्री बनायला निघा, कुणीही तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार नाही.
ISBN No. | :782 |
Author | :Sirshree |
Publisher | :Wow Publishings Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :240 |
Language | :Marathi |
Edition | :3rd/2011 |